VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Thursday, August 2, 2018

इंडियन बँक ऑफिसर पदाच्या एकूण ४१७ जागा

इंडियन बँक यांच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ४१७ जागा

इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रोबशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ४१७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – 1 ऑगस्ट 2018 रोजी 20 ते 30 वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती करिता ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांनासाठी 3 वर्षे सवलत.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ६००/- रुपये तर अनुसूचित जाती/ जमाती आणि अपंग उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
प्रवेशपत्र – पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 24 सप्टेंबर २०१८ पासून 22 ऑक्टोबर २०१८ पासून उपलब्ध होईल.
परीक्षा – पूर्व परीक्षा 6 ऑक्टोबर २०१८ रोजी आणि मुख्य परीक्षा 4 नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers