VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Friday, August 3, 2018

संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) संस्थेत विविध पदाच्या एकूण ४९४ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) संस्थेत विविध पदाच्या एकूण ४९४ जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाच्या एकूण ४९४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (विज्ञान) / अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदविका / वाचनालय पदविका.
वयोमर्यादा – 29 ऑगस्ट 2018 रोजी उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ जमाती करिता ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.
फीस – खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये राहील.(अनुसूचित जाती/ जमाती आणि माजी सैनिक उमेदवारांना कुठल्याही प्रकारची फीस नाही.
अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 ऑगस्ट २०१८ पासून उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers