VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Thursday, August 2, 2018

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१८

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फ़त केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ जाहीर   

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी १६ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
परीक्षा – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१८
शैक्षणिक पात्रता – इयत्ता 1 ली ते 5 वी करिता ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि डीईएड किंवा समतुल्य तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी करिता ५०% गुणांसह पदवी आणि बीएड किंवा समतुल्य पात्रता असावी.
परीक्षा फीस – पहिल्या किंवा दुसऱ्या (केवळ एकच) पेपरसाठी खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/जमाती करिता ३५०/- रुपये तसेच पहिल्या आणि दुसऱ्या (दोन्ही) पेपरसाठी खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १२००/- रुपये आणि अनुसूचित जाती/जमाती करिता ६००/- रुपये राहील.
परीक्षा – 16 सप्टेंबर 2018 रोजी (सकाळी 9:30 ते दुपारी 12:00 आणि दुपारी 2:00 ते 4:30)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers