VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Wednesday, July 18, 2018

सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ७२३ जागा

सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ७२३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व जिल्ह्याच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण ७२३ जागा
शैक्षणिक पात्रता – संवैधानिक विद्यापीठातील एम.बी.बी.एस. किंवा तत्सम पदवी आवश्यक. भिषक, बालरोगतज्ञ, शल्य चिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, भूलतज्ञ, क्ष-किरण तज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी या विशेषज्ञ शाखेतील पदव्युत्तर पदविका/ पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य.
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी प्रचलित नियमानुसार (मागासवर्गीयांना नियमानुसार सवलत.)

शुल्क – खुल्या वर्गातील उमेदवारांना ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये राहील.
अर्ज पाठिविण्याचा पत्ता – संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, पिनकोड: ४०० ००१
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers