VIRAL GAWALI

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Viral Gawali

Tuesday, July 24, 2018

90 हजार पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षा*

*🚉RRB Recruitment 2018:- 90  हजार पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षा*



 *रेल्वेने सर्वात मोठी नोकरभरतीची तारीख जाहीर केली आहे. जवळपास 90 हजार पदं रेल्वेत भरली जाणार आहेत.*

_📌 त्यासाठी 9 ऑगस्टपासून परीक्षा घेतली जाणार आहे._

_🔰 रेल्वेची ही ऑनलाईन परीक्षा देशातील सर्व महानगरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 26 हजार 502 जागा भरण्यात येणार आहेत._

_*🔰 असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही पदं पहिल्या टप्प्यात भरण्यात येतील.*_ 

_📌 26 जुलैपासून कोणाची परीक्षा कोणत्या शहरात आहे याबाबतची माहिती प्रसिद्ध होईल._

_*🔰 परीक्षार्थी आपलं ई-कॉल लेटर परीक्षेपूर्वी चार दिवस आधीच डाऊनलोड करु शकतील. म्हणजेच 9 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या परीक्षेचं ई-कॉल लेटर 5 ऑगस्टपासून डाऊनलोड करता येईल.*_

_📌 रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या 89,409 पदांसाठी रेल्वेने ऑनलाईन अर्ज मागवले होते. यासाठी देशभरातून 2.37 कोटी अर्ज आले आहेत._

_📌 पहिल्या टप्प्यातील असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही भरती होणार आहे. मात्र ग्रुप डी ची पदभरतीची परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही._

_🔰 तीन टप्प्यात ही परीक्षा होणार आहे. 26 जुलैपासून Railway Recruitment Control Board च्या वेबसाईटवर परीक्षेबाबतची माहिती मिळेल._

_📌 परीक्षा रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी होणार नाही._

*🔰 कशी असेल परीक्षा?*

_📌 ऑनलाईन परीक्षा 60 मिनिटांची असेल._

_📌 दिव्यांग परीक्षार्थींना अतिरिक्त 20 मिनिटे मिळतील._

_📌 या परीक्षेत 75 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे चार पर्याय उपलब्ध असतील._

_📌 चुकीचं उत्तर दिल्यास एक तृतीयांश गुण वजा केले जातील._

*🔰 ग्रुप सी - परीक्षेचं प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी टिप्स :-*

*1 - rrb च्या वेबसाईटवर प्रवेश पत्र उपलब्ध झाल्यानंतर ते rrbcdg.gov.in यावरुन डाऊनलोड करता येईल.*

*2- rrbcdg.gov.in या वेबसाईटवर RRB Recruitment Group C Exam Admit Card यावर क्लिक करा*

*3 - परीक्षार्थी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करु शकतो*

*4- त्यानंतर Admit Card या टॅबवर क्लिक करा*

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers